स्वातंत्र्यवीर सावरकर !

प्रसिद्ध कलाकार आणि वक्ते राहुल सोलापूरकर सादर करत आहेत एक रोमांचकारी व्याख्यान.

इतिहासात होऊन गेलेल्या अनेक महान व्यक्तिमत्वांपैकी फारच कमी नेत्यांना द्रष्टा ह्या उपाधीने नावाजले गेले. भविष्यातील घटनांचा तर्कशुद्ध विचार करून देशहितासाठी सावरकरांनी आपले आयुष्य वेचले. सावरकरांची वेगळी ओळख करून द्यायची खरे तर काहीच आवश्यकता नाही. पारतंत्र्यातील अवहेलना स्वातंत्र्यानंतरसुद्धा अनुभवणार्या सावरकरांचा, आचार्य अत्र्यांनी स्वातंत्र्यवीर ह्या उपाधीने यथोचित सन्मान करून, कसर भरून काढण्याचा छोटासा प्रयत्न केला.

आयुष्यभर प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत, कुठलेही पद आणि अधिकार नसताना निर्वाहः प्रतिपन्नेषु वृत्तीने देशसेवा करणार्या सावरकरांमधील द्रष्टेपणाची, त्यांच्याच शब्दात ओळख करून द्यायची तर … मी जे सांगतो, ते तुम्हाला ५० वर्षांनी पटेल. तोपर्यंत थांबण्याची माझी तयारी आहे!

RSVP Closed