प्तसुरात गाणारे व्हायोलि !!!

 

 

छंद आपल्या जीवनाचा भाग असतो ही गोष्ट खरी पण तो छंद किती काळ आणि किती उत्कटतेने आपण जोपासतो? काहींच्या बाबतीत तो अस्तित्वाचा भाग होऊन जातो. छंद जिवलग मित्र होतो. मग लक्षात येतं कि तो मित्र सेलिब्रिटी आहे. त्या एका सेलिब्रिटी मित्रामुळे अIपल्याला असंख्य मित्र मिळतात. जगात आपली ओळख सेलिब्रिटी चा मित्र म्हणून  होते.

महेश खानोलकर च्या आयुष्यात नेमकं हेच  घडलं. एक छंद त्याने ५३ वर्षे जोपासला. तो त्याचा अस्तित्वाचा भाग होऊन गेला. तोच त्याचा मित्र झाला. असा मित्र जो celebrity आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून violin हा महेशचा जिवलग छंद -मित्र. ह्या मित्रा बरोबर महेशनी ५००० पेक्षा जास्त वेळा हजारो लोकांचं, जगभरात मनोरंजन केलं आहे. ह्याच मित्रामुळे त्याला श्रीनीवास खळे, अरुण दाते आणि शंकर महादेवन सारखे अनेक दिगग्ज भेटले. त्यातले बरेच त्याचे चाहते बनले. महेश खानोलकर हे संगीत दिग्दर्शकांना, गायकांना, प्रेक्षकांना का हवे असतात ह्याचा उलगडा आपणास होणार आहे.

तर मित्र-मैत्रिणींनो  कलाविष्कार-डीसी व मराठी कला मंडळ  तुम्हा सर्वांना येत्या  June 27th, 2020  सकाळी ११:०० वाजता  नेणार आहोत संगीताच्या विश्वात, महेश खानोलकर सोबत. तेथे भेटतील आपल्या ओळखीची हिंदी, मराठी गाणी, आणि आवडते राग. ह्या प्रवासात  दिसेल violin चा भारतीय संगीतातला प्रवास आणि त्याने  मिळवलेलं मानाचं  स्थान.

हा कार्यक्रम मोफत आहे पण सगळ्या संगीत प्रेमींना आवाहन आहे कि ऐच्छिक शुल्क भरून असे दर्जेदार कार्यक्रम आपल्या पर्यंत आणण्यास मदत करावी. 

Kalavishkar DC and Marathi Kala Mandal would like to introduce Mahesh Khanolkar, a distinguished violin player who will introduce his celebrity friend the  “Violin” to us. He will take us on an unusual journey into the violin universe. We will meet the popular songs of Hindi/Marathi and understand how the violin enriches the melody and beauty of a song. We will understand the respectable place of the violin in Hindustani music. Mahesh is Violin-Sadhak for the last 53 years and has over 5000 public performances with distinguished personalities of Marathi and Hindi music industry. Mahesh has accompanied Shrinivas Khale, Arun Date, Shankar Mahadevan, and many other elite artists and respected musicians. Masheh has earned several prestigious awards and recognitions including “Vasant Desai Puraskar”.

 

Date & Time: June 27th, 11.00 AM to 12.30 PM on MKM Zoom
Contributions : Optional but welcome 

RSVP Closed